/* गुण गाईन...: January 2006*/

Monday, January 30, 2006

सर...पेढे.....

सर...पेढे.....

कशाचे रे ?

प्राज्ञ परिक्षा पास झालो....

प्राज्ञ परिक्षेची पातळी झटकन आपल्या लक्षात आली असेलच....

आपलाच,

---सखाराम अप्पाजी गट्णे.

ता.क. प्राज्ञ परिक्षेची जागा आता विद्यापीठाच्या लेखी पात्रता परिक्षेने घेतली आहे, एवढाच काय तो फरक....असॊ.

Sunday, January 15, 2006

कॅलिफोर्नियाचा कोकण होतोय!

कोणे एके काळी असे ऎकीवात होते की कोकणचा कॅलिफोर्निया होणार......बहुदा कुण्या मंत्र्यांनी निवडणुकी पुर्वी दिलेल्या घोषणा असाव्यात...कोकणाचा कॅलिफोर्निया कधी होणार ते देव जाणो...पण कॅलिफोर्नियाचा कोकण झाला आहे, यात शंकाच नाही...
आता कॅलिफोर्नियात कुठेही जा, जोशी, देशपांडे, पाटील, माझ्यासारखे "आणि मंडळी" ही नावे केवळ आपल्याल्याच नाही, तर अमेरिकन लोकांना सुध्दा ओळखीची झाली आहेत. त्यामध्ये चित्त्पावनांचे प्रमाण अधिक. म्हणूनच कॅलिफोर्नियन हा अमेरिकन न राहता कोकणस्थ झाला आहे. माझ्या मते खरे कोकणस्थ हे कोकणात राहत नसून पुण्यनगरीत(कोथरुड)किंवा कॅलिफोर्नियात राहतात. पुर्वी हे सदाशिव पेठेत राहायचे.. बाकी कोकणस्थ आणि अमेरिकन लोकांमध्ये बरेच साम्य आहे. गौर वर्ण,घारे किंवा निळे डोळे,टापटीप राहणी,कामाचे; वेळेचे नीट नियोजन आणि आणखीन बरेच काही...
मी नुकतेच ऎकले की, अमेरिकेमध्ये आता हिंदी भाषा शाळांमध्येसुध्दा शिकायला मिळणार आहेत... म्हणजे, आणखी पाच सात वर्षातच इथल्या High-Schools मध्ये मराठी अध्यापनास सुध्दा सुरुवात होईल. पुण्यात अभिनव,ज्ञानप्रबोधिनी, नू.म.वि., मुक्तांगण यासारख्या अनेक नामांकित शाळा आहेत. त्या सम्रॄध्द आहेत, सुसज्ज आहेत. अनेक उत्तमोत्तम विद्यार्थ्यांना त्यानी संस्कारित केले आहे, घडविले आहे. जर इतर देशातल्या International Schools आपल्याकडे येत आहेत, तद्वत एखाद्या तरी शाळेने कॅलिफोर्नियात असा अभिनव उपक्रम करण्यास काय हरकत आहे. प्रबोधनाचे हे अतिशय पवित्र कार्य आपण का करु नये....?
जसे शिक्षणाचे, तसेच संस्कॄतीचे.....गणेशोत्सव,दहिहंडी, पुणे फेस्टिवल,पुरूषोत्तम/फिरॊदिया करंडक, बालगंधर्व रंगमदिर,सवाई गंधर्व महोत्सव,या आणि यासारख्या असंख्य सुंदर गोष्टींचा मिलाप फ़क्त पुण्यातच का? चितळॆ बंधू मिठाईवाले, जोशी वडेवाले, सुजाता मस्तानी, झटका भेळ यांची रेलचेल फक्त पुण्यापुरतीच मर्यादीत का ? या सर्व गोष्टींचा नितांत सुंदर अनुभव सकलजनांना मिळवा अन् महाराष्ट्र धर्म वाढावा, एवढीच अपेक्षा....
मराठी पाऊल पुढे पडलेलेच आहे. त्यांच्या चिमुकल्या पावलांचे देखील मराठीपण वॄधिंगत व्हावे, हीच सदिच्छा !!

---जयदीप कुलकर्णी.

Sunday, January 08, 2006

सर...

अस का होतं ? काही व्यक्तींची आपली ओळख असायला हवी असे उगीचच राहून राहून का वाटतं? परवाच समीरने गाडगीळ सरांचे व्यंगचित्र post केले. पाठोपाठ लगेचच अजितने त्यांच्याविषयीच्या आठवणींना शब्दरुप दिले. का कुणास ठाउक, मला असं वाटलं की, माझी सुध्दा गाडगीळ सरांशी ओळख असायला हवी होती. वास्तविक मी गाडगीळ सरांना कधीही पाहिलेले नाही, कधी भेटलेलॊ नाही. पण अशी कोणती शिकवण त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना दिली असेल, की आज अनेक वर्षे झाली, तरी सर्व विद्यार्थी त्यांचे नाव अगदी तेवढ्याच आदराने आणि आपुलकीने घेतात.आजही त्यांच्या सरांबद्दलच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत....
लहानपण पुन्हा मिळाले, तर एखाद्या निरागस मुलाप्रमाणे त्यांच्याकडून गणित,भूमितीची प्रमेये शिकायला नक्की आवडेल. जर कधी नाशिकात जायची संधी मिळाली, तर गाडगीळ सरांना भेटुन आठवणीने आठवणीत ठेवण्यासाठी एखदी तरी हृद्य आठवण नक्कीच साठ्वीन.....

खरचं, या सरांचे मोठेपण स्वत:(वयाने) मॊठे झाल्याशिवाय कळत नाही !!

Saturday, January 07, 2006

आरंभशुर

सुस्वागतम्!
एखाद्या आरंभशुराप्रमाणे Blog-लेखनाचा "श्री गणेशा" या नववर्षानिमित्त करतोय. बघुया, उत्साह किती काळ टिकतोय....ईयत्ता दहावी नंतर मराठीत लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. माझे सुध्द्लेखन किती चांगले आहे याची चांगलीच जाणीव झाली आहे.असो....
महाराष्ट्रातल्या असंख्य 'पुलकितां' प्रमाणे मी ही एक. त्यामुळे केवळ चांगलेच,तरल,अ-राजकीय,अ-व्यक्तिगत,हलके-फुलके आणि प्रसंगी मार्मिक Blogs लिहीण्याचा मानस आहे. म्हणूनच "गुण गाईन आवडी....."