/* गुण गाईन...: कॅलिफोर्नियाचा कोकण होतोय!*/

Sunday, January 15, 2006

कॅलिफोर्नियाचा कोकण होतोय!

कोणे एके काळी असे ऎकीवात होते की कोकणचा कॅलिफोर्निया होणार......बहुदा कुण्या मंत्र्यांनी निवडणुकी पुर्वी दिलेल्या घोषणा असाव्यात...कोकणाचा कॅलिफोर्निया कधी होणार ते देव जाणो...पण कॅलिफोर्नियाचा कोकण झाला आहे, यात शंकाच नाही...
आता कॅलिफोर्नियात कुठेही जा, जोशी, देशपांडे, पाटील, माझ्यासारखे "आणि मंडळी" ही नावे केवळ आपल्याल्याच नाही, तर अमेरिकन लोकांना सुध्दा ओळखीची झाली आहेत. त्यामध्ये चित्त्पावनांचे प्रमाण अधिक. म्हणूनच कॅलिफोर्नियन हा अमेरिकन न राहता कोकणस्थ झाला आहे. माझ्या मते खरे कोकणस्थ हे कोकणात राहत नसून पुण्यनगरीत(कोथरुड)किंवा कॅलिफोर्नियात राहतात. पुर्वी हे सदाशिव पेठेत राहायचे.. बाकी कोकणस्थ आणि अमेरिकन लोकांमध्ये बरेच साम्य आहे. गौर वर्ण,घारे किंवा निळे डोळे,टापटीप राहणी,कामाचे; वेळेचे नीट नियोजन आणि आणखीन बरेच काही...
मी नुकतेच ऎकले की, अमेरिकेमध्ये आता हिंदी भाषा शाळांमध्येसुध्दा शिकायला मिळणार आहेत... म्हणजे, आणखी पाच सात वर्षातच इथल्या High-Schools मध्ये मराठी अध्यापनास सुध्दा सुरुवात होईल. पुण्यात अभिनव,ज्ञानप्रबोधिनी, नू.म.वि., मुक्तांगण यासारख्या अनेक नामांकित शाळा आहेत. त्या सम्रॄध्द आहेत, सुसज्ज आहेत. अनेक उत्तमोत्तम विद्यार्थ्यांना त्यानी संस्कारित केले आहे, घडविले आहे. जर इतर देशातल्या International Schools आपल्याकडे येत आहेत, तद्वत एखाद्या तरी शाळेने कॅलिफोर्नियात असा अभिनव उपक्रम करण्यास काय हरकत आहे. प्रबोधनाचे हे अतिशय पवित्र कार्य आपण का करु नये....?
जसे शिक्षणाचे, तसेच संस्कॄतीचे.....गणेशोत्सव,दहिहंडी, पुणे फेस्टिवल,पुरूषोत्तम/फिरॊदिया करंडक, बालगंधर्व रंगमदिर,सवाई गंधर्व महोत्सव,या आणि यासारख्या असंख्य सुंदर गोष्टींचा मिलाप फ़क्त पुण्यातच का? चितळॆ बंधू मिठाईवाले, जोशी वडेवाले, सुजाता मस्तानी, झटका भेळ यांची रेलचेल फक्त पुण्यापुरतीच मर्यादीत का ? या सर्व गोष्टींचा नितांत सुंदर अनुभव सकलजनांना मिळवा अन् महाराष्ट्र धर्म वाढावा, एवढीच अपेक्षा....
मराठी पाऊल पुढे पडलेलेच आहे. त्यांच्या चिमुकल्या पावलांचे देखील मराठीपण वॄधिंगत व्हावे, हीच सदिच्छा !!

---जयदीप कुलकर्णी.

3 Comments:

Blogger Milind said...

काय रे, कॅलिफोर्नियस्थ होण्याचा विचार आहे की काय? ;)

8:39 PM  
Blogger जयदीप कुलकर्णी said...

नाही रे ! उलट, मीच इथे वडा-पाव आणि बाखरवडी मिळवण्याचा प्रयत्नात आहे... पुणे तिथे काय उणे हे अगदी १०० ट्क्के खरं !

9:11 PM  
Blogger Sagar Joshi said...

u hv a blog now....

3:24 PM  

Post a Comment

<< Home